आदिवासींचे हक्क कायम राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:56 PM2017-12-25T23:56:44+5:302017-12-25T23:57:08+5:30
देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे. शिक्षित होऊन उच्चपदावर पोहचला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वतोपरी मदत करायला तयार असून देशात अन्य समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुल येथे आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. अधिवेशनाला विशेष अतिथी म्हणून राष्टÑीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आ. राजू तोडसाम, गोंडराजे चांदगड विरेंद्रशहा आत्राम, बीओआय एम्प्लाईज विदर्भचे अध्यक्ष अवचितरा सयाम, गोंगपा प्रदेशाध्यक्ष वासुदेव टेकाम आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके आदींची उपस्थिती होती.
ना. अहीर पुढे म्हणाले, आदिवासींच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचा हक्क व विकास कुणीच रोखू शकत नाही. आदिवासी समाजातील देशाला योगदान देण्याचा इतिहास लोकांना कळला पाहिजे. चंद्रपुरात होऊ घातलेल्या या सूवर्ण महोत्सवी अधिवेशनात महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि योगदान देणारे आदिवासी समाजबांधव एकत्र आले आहे. त्याचे एकवटणे हीच खरी परिवर्तनाची नांदी होय, असे गौरवोदर त्यांनी काढले. आदिवासी समाजाची प्रगती साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आखल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी सवलती व अन्य शैक्षणिक योजनांतून त्यांचा सर्वांगीण विकास हेच सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे आज आदिवासी समाजाचे संघटन मजबूत झाले असल्याचे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यानी यावेळी केली. त्यानंतर मायाताई इवनाते, विरेंद्रशहा आत्राम, अवचितराव सयाम वासुदेव शहा टेकाम यांचीही समयोजित भाषणे झाली. अधिवेशनात राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया आदिवासी बांधवाचा सत्कार करण्यात आला.
दुसºया सत्राम ‘सामाजिक उत्थानात आदिवासी एम्प्लाईजची भूमिका’ या विषयावर व्याख्यान तथा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तिसºया सत्रात खुले अधिवेशन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर उईके होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून फेडरेशनचे दिलीप मडावी, सुरेश कन्नाके, डॉ. चेतनकुमार मसराम, नंदीनी बागूल, खुशालसिंग सुरपाम, विजय कोकोडे, माधवराव गावड, डॉ. नरेंद्र कोडवते, लक्ष्मणराव घोटकर व सुधाकर मडावी आदीची उपस्थिती होती. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासींचे पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी प्रा. धिरज शेडमाके, सुरेश कन्नाके, डॉ. खडाते उपस्थित होते.