आदिवासी विद्यार्थी आॅलम्पिक पदकही आणतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:56 PM2018-06-27T22:56:31+5:302018-06-27T22:57:11+5:30

जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Tribal students will bring Olympic medal | आदिवासी विद्यार्थी आॅलम्पिक पदकही आणतील

आदिवासी विद्यार्थी आॅलम्पिक पदकही आणतील

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : इंदिरा नगरात आदिवासी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व महाराणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळाच्या वतीने स्थानिक इंदिरानगर येथे बुधवारी पार पडलेल्या आदिवासी समाज प्रबोधन स्वाभिमान मेळाव्यात बोलत होते. यावेळी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, नगरसेविका चंद्रकला सोयाम उपस्थित होते. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी विविध क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख करून ना. मुनगंटीवार म्हणाले, एव्हरेस्ट सर गाठणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होणार आहे. या मुलांच्या स्वागतासाठी अभिनेते आमिर खान हेदेखील उत्सुक आहेत. आदिवासी बांधवांमध्ये उपजत चिकाटी व प्रामाणिकपणे यश मिळविण्याची प्रचंड जिद्द आहे. येत्या काही काळात महाराष्ट्राचा सन्मान वाढविण्यासाठी या शक्तीचा वापर केला जाईल. ही सुरूवात असून ‘आॅपरेशन शौर्य’ नंतर लवकरच ‘मिशन शक्ती’ ला सुरुवात करणार आहे. शासनाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र बदल असल्याचेही ना. सुधीर मुनंटीवार यांनी मेळाव्याप्रसंगी सांगितले.

बांबूपासून रोजगाराची संधी
चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे. पोंभुर्णा तालुक्यामध्ये १ हजार आदिवासी महिलांना कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांची कंपनी तयार स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. आदिवासींनी संघटीत होवून सामाजिक व आर्थिक विकास करावा, असे आवाहन पालकमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Web Title: Tribal students will bring Olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.