बाबूजींना रक्तदानाने आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:01+5:30
गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, लोकमतच्या रक्तदान शिबिरात त्यांनी २४ वेळा रक्तदान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धनराज प्लाझा बिल्डींगमधील दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.
सकाळी ११ वाजता स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, आनंद नागरी बँकेचे संचालक जितेंद्र चोरडिया, लोकमतचे वितरक रमण बोथरा, लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूरचे डॉ. रवी भांगे, डॉ. रवी गजभिये आदी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता उदघाटनानंतरच या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर रक्तदानानंतर रक्तदात्याला प्रमाणपत्र, डोनर कार्ड, सॅनिटायझर आणि मास्क भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी केले. यावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ ठोंबरे, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे, विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहीलकर, उपाध्यक्ष संजिवनी कुबेर, कमल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष नेत्रा इंगुलवार, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य उपस्थित होते. नेत्रा इंगुलवार यांनी शिबिरात येणाºया सर्वांना मास्कचे वितरण केले.
संजय वैद्य यांचे १०६ व्या वेळा रक्तदान
राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी रक्तदान चळवळीत अत्यंत निष्ठेने योगदान देऊन आरोग्य क्षेत्रातही बांधिलकी जोपासली आहे. गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर केव्हाच गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०६ हा आकडा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, लोकमतच्या रक्तदान शिबिरात त्यांनी २४ वेळा रक्तदान केले आहे.