बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त शनिवारी चंद्रपुरात आदरांजली कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 05:00 AM2022-07-01T05:00:00+5:302022-07-01T05:00:11+5:30
‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या पुढाकारात दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. यावर्षीदेखील अशा प्रकारचे शिबिर अत्यंत व्यापकरीत्या आयोजित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार दि, २ जुलै रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत चंद्रपुरातील गंज वॉर्ड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोबतच ‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या पुढाकारात दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. यावर्षीदेखील अशा प्रकारचे शिबिर अत्यंत व्यापकरीत्या आयोजित करण्यात आले. या मानवतावादी महायज्ञात रक्तदान करण्यासाठी शहरातील रक्तदात्यांसह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनां, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, सखी मंच सदस्यांनी आपली नोंदणी करावी. हे शिबिर दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येईल. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मान्यवरांची हजेरी
- ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर बाबूजींना आदरांजली अर्पण करणार आहेत.