आदिवासी एव्हरेस्टवीरांची कामगिरी कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:23 PM2018-06-05T22:23:43+5:302018-06-05T22:23:59+5:30

जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला.

The tribute of tribal Everestee is appreciated | आदिवासी एव्हरेस्टवीरांची कामगिरी कौतुकास्पद

आदिवासी एव्हरेस्टवीरांची कामगिरी कौतुकास्पद

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया : आदिवासींच्या रोजगारांचे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला. एव्हरेस्टवीरांची कामगिरी देशासह जिल्ह्यालाही कौतुकास्पद आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाला प्रयत्नाचे बळ देउन एव्हरेस्टवीरांनी देशाचा व राज्याचा मान वाढविला, अशी आपुलकीची भावना माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी एव्हरेस्टवीरांप्रती व्यक्त केली.
राज्यातील १८ जिल्ह्यातील आदिवासी बांधव मुख्य रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलन व बांबू कटाई व्यवसाय आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २००३ - २००४ पासून बोनस देण्याची तरतूद केली होती. त्यामुळे एका आदिवासी कुटुंबाला एका हंगामात १० ते १२ हजार रूपयांची मिळकत मिळत होती. त्यामुळे त्यांचा किमान सहा महिन्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला जात होता. यामुळे लाखोवर आदिवासी बांधवांना दिलासा मिळत होता. मात्र विद्यमान वनमंत्र्यांनी व वनविभागाने आदिवासी बांधवांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रातून केला आहे.

Web Title: The tribute of tribal Everestee is appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.