ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्या
By admin | Published: April 10, 2017 12:50 AM2017-04-10T00:50:17+5:302017-04-10T00:50:17+5:30
आजचचे युग स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यक असल्याचे
जि.प. अध्यक्षांचे प्रतिपादन : डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन, पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कुरखेडा : आजचचे युग स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तसेच ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
कुरखेडा येथील आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सभापती नाना नाकाडे तर विशेष अथिती म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव फाये, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजुक पुराम, संपत आळे, गीता कुमरे, लता पुंगाटी, कुरखेडा पंचायत समितीचे उपसभापती मनोज दुनेदार, जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, संस्था सचिव दोषहरराव फाये, चांगदेव फाये, सहसचिव नागेश्वर फाये, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, नगर पंचायत सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक बबलू हुसैनी, रामहरी उगले, गुणवंत फाये, अॅड. उमेश वालदे, नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, रमेश बावणथडे, मधुकर भांडेकर, प्राचार्य पी. डब्ल्यू. भरणे, डॉ. मनोहर आत्राम, दोनाडकर, रामटेके, सुरेखा वनकर, निर्मला कोडाप, देवेंद्र फाये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, कृषी सभापती नाना नाकाडे व नवनिर्वाचित जि.प. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विनोद नागपुरकर तर आभार लिलाधर बडवाईक यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)