डोणी फाट्यावर तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:48 PM2017-09-14T22:48:18+5:302017-09-14T22:48:43+5:30

मूल-चंद्रपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डोणी फाट्यावर घडली.

Triple accidents at Doni Phat | डोणी फाट्यावर तिहेरी अपघात

डोणी फाट्यावर तिहेरी अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देविचित्र घटना : १ ठार, ६ जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल-चंद्रपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डोणी फाट्यावर घडली. अपघातात दिवाकर विठोबा निमगडे (६२) रा. मूल यांचा जागीच मृत्यू झाला.
अंबादास पांडुजी रामटेके, रा. मूल, राजेंद्र दिवाकर कन्नमवार, दिवाकर कन्नमवार, लिलाबाई कन्नमवार रा. ताडाळा, मंगेश आनंदराव पुण्यपरेड्डीवार रा. लखमापूर बोरी, योगेश रमेश मोहुर्ले रा. चिमढा हे गंभीर जखमी आहेत. बुधवारी रात्री ७.३० वाजता सुमारास मूल-चंद्रपूर मार्गावरील डोणी फाट्याजवळ एमएच ३४ ए १४८८ हा ट्रक नादुरस्त असल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी ट्रक चालकाने ट्रकचे इंडिकेटरही सुरू केलेले नव्हते. तसेच तो त्या ट्रक जवळ उभाही नव्हता.
मूल येथील अंबादास रामटेके हे जावई दिवाकर निमगडे यांच्यासोबत दुचाकीने सुशी येथून मुलकडे येत होते. दरम्यान मूलकडून चंद्रपूरकडे जाणाºया एका चारचाकी वाहनाच्या लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे दुचाकी वाहन चालकाचे डोळे दीपले. यातच रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला जबर धडक बसली. यात दिवाकर निमगडे हे जागीच ठार झाले.
अपघातामुळे दुचाकी रस्त्याच्या मध्ये पडली. त्यानंतर काही क्षणात ताडाळा येथील राजेंद्र कन्नमवार हे वडील दिवाकर कन्नमवार आणि आई लीलाबाई कन्नमवार यांना घेवून चारचाकी वाहनाने येत असताना दुचाकीवर धडकले. यात दोन्ही वाहनातील इसम गंभीर जखमी झाले.
या दरम्यान आणखी एक चारचाकी वाहन वाहन मूलवरून चंद्रपूरकडे जात असताना अपघातस्थळाजवळ पूर्वीच्या अपघातग्रस्त चारचाकी वाहनाला धडक बसली. त्यामुळे त्या वाहनातील इसमही जखमी झाले. यामुळे या मार्गावरील संपुर्ण वाहतूक खोळंबली असतानाच एमएच ३४ एम ७९३० या क्रमांकाच्या ट्रक चालकाने सुद्धा अपघातग्रस्त चारचाकी वाहनाला धडक दिली.
या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून रहदारी सुरळीत केली. जखमींना उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून उपचार सुरू आहे.

Web Title: Triple accidents at Doni Phat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.