ट्रक- ट्रॅव्हल्सच्या धडकेत एक ठार
By admin | Published: April 11, 2017 12:45 AM2017-04-11T00:45:25+5:302017-04-11T00:45:25+5:30
मूलपासून तीन किमी अंतरावर उमा नदीच्या वळणावर ट्रक व ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर १३ जण जखमी झाल्याची घटना ...
१३ प्रवासी जखमी : मूलच्या उमा नदीजवळील घटना
मूल : मूलपासून तीन किमी अंतरावर उमा नदीच्या वळणावर ट्रक व ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर १३ जण जखमी झाल्याची घटना दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान घडली. इतर गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पितांबर दादाजी कोतकोंडावार (३२) रा. बाजार वार्ड हा जागीच ठार झाला तर जखमीमध्ये रामकिशन रागीट (२८), विशाल किशोर खाडीलकर (२६), किशोर भगत (४५), यशवंत दुलिराम लांगे (३८) केतन मांडवकर (२१), गौतम अवथरे (३४), दुर्वास गावंडे (४०), सचिन आंबेकर (२७), धनराज काळे (२७), राहुल पंधरे (२२), नितीन पोहनकर (२५), सत्यवान मोहुर्ले (५०), जगदीश लोनबले (३२) आदींचा समावेश आहे.
सावलीवरुन खोसला कंपनीचा ट्रक क्र. एमएच ३४ एम- ५२५६ हा पोकलँड घेऊन चंद्रपूरकडे जात होता. मूलवरुन एमआयडीसी स्थित ग्रेटा कंपनीची ट्रव्हल्स क्र.एमएच- ३३- ५८७ दुपारी २ वाजताच्या शिफ्टसाठी मूलवरुन कामगारांना घेऊन जात होती. मूलवरुन तीन किमी अंतरावर असलेल्या उमा नदीच्या वळणावर दोन्ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक झाली. त्यात एक ठार व १३ जखमी झाले.पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)