कोळशाची जड वाहतूक करणारे ट्रक नागरिकांनी अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:24+5:302021-08-12T04:32:24+5:30
वरोरा : वरोरा शहरानजीक असलेल्या एकोना मार्डा कोळसा खाणीतून कोळशाची जड वाहतूक वरोरा शहरातून सातत्याने केली जात आहे. यामुळे ...
वरोरा : वरोरा शहरानजीक असलेल्या एकोना मार्डा कोळसा खाणीतून कोळशाची जड वाहतूक वरोरा शहरातून सातत्याने केली जात आहे. यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊन उपयोग न झाल्यामुळे नागरिकांनी हे ट्रक मंगळवारी अडवून धरले.
वरोरा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एकोना-मार्डा या ठिकाणी कोळसा खाण सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक करणारे ट्रक नियमितपणे एमआयडीसीकडे कोळसा भरून नेले जातात. याकरिता एकोना ते एमआयडीसी असा मार्ग निर्धारित केलेला असतानासुद्धा हे जड वाहतूक करणारे ट्रक माढेळी नाका ते नगरपरिषदेच्या पुढील सिमेंट रोडणे नेले जातात. हा रोड अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावर शाळा आणि दवाखानेसुद्धा आहेत. या जड वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून नागरिकांना प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बॉक्स
यापूर्वी केले होते आंदोलन
यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी शिवाजी वार्डातील नागरिकांनी मोठे आंदोलनही केले होते. त्यानंतर काही काळ ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा याच मार्गाने वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांनी सोमवारच्या रात्री लोकमान्य शाळेजवळ तसेच मंगळवारी सकाळी माढेळी नाका परिसरात ट्रक अडविले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नागरिकांचा राग अनावर होत असताना पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी हे सर्व ट्रक पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही वाहतूक यानंतर न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
100821\img-20210810-wa0040.jpg
warora