ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:35 PM2018-12-04T22:35:10+5:302018-12-04T22:35:27+5:30
हसत खेळत घेणारे शिक्षण आनंद व सुख, समाधान देणारे असते. मनामध्ये ध्येय ठरवून संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास ठेवला, तर ध्ययेपूर्ती सहज शक्य होते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हसत खेळत घेणारे शिक्षण आनंद व सुख, समाधान देणारे असते. मनामध्ये ध्येय ठरवून संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास ठेवला, तर ध्ययेपूर्ती सहज शक्य होते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.
स्थानिक चांदा पब्लिक स्कूल येथे आयोजित ‘एज्यु-फिस्ट-२०१८’ चा समारोपीय कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आसावती शेनोलीकर, शाळेच्या संचालिका स्मिता जीवतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पांडेय आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आसावरी शेनोलिकर म्हणाल्या, शिक्षण मनुष्याला नम्र बनवितो. नम्रतेने मनुष्य महान बनतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक व्यक्ती इतिहासातून काही ना काही बोध घेत असतो, म्हणूनच ‘इतिहास के पन्नोसे’ ही नाविन्यपूर्ण व कल्पक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिव्या अरोरा विजयी ठरली. एकपात्री अभिनय स्पर्धेत केशर खराबे विजयी झाली.
दहा दिवसीय विविध स्पर्धामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रस्तुतीकरण व विद्यार्थ्यांनी केलेल्या आनंदाची उधळण तसेच वर्षभरातील विविध स्पर्धामध्ये दाखविलेली कामगिरीचा वार्षिक आढावा विद्यार्थी प्रमुख महावीर खजांची व बुंद दवे यांनी डॉक्युमेंटरीद्वारे उपस्थित पाहुण्यांसमोर मांडला.
विद्यार्थ्यानी केलेल्या सर्व प्रकारच्या सादरीकरणाचे उपस्थित पाहुण्यांनी व पालकांनी तोंडभर कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका मंजुषा गौरकर, निलीमा पाऊनकर यांनी तर आभार अंजली बंडावार यांनी मानले. यावेळी प्रिती खोब्रागडे, आम्रपाली नगराळे, महेश गौरकार, फहीम शेख, शोभा जाना, शिल्पा खांडरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.