म्हाताºया विधवेची जमीन हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:42 PM2017-08-30T23:42:03+5:302017-08-30T23:42:21+5:30

तालुक्यातील बिबी येथील शेत सर्वे नं. ८७/२, ८८, ८९/१/अ या शेतजमिनीचा मागील दोन महिन्यांपासून पार्वता मुकुंदा पावडे (७०) व अंजली विनायक पावडे (३६) असा सासू-सुनेचा वाद सुरु आहे.

Trying to grab land of this widow | म्हाताºया विधवेची जमीन हडपण्याचा प्रयत्न

म्हाताºया विधवेची जमीन हडपण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देन्यायासाठी धडपड : मंडळ अधिकाºयांचा अहवाल फाडला

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील बिबी येथील शेत सर्वे नं. ८७/२, ८८, ८९/१/अ या शेतजमिनीचा मागील दोन महिन्यांपासून पार्वता मुकुंदा पावडे (७०) व अंजली विनायक पावडे (३६) असा सासू-सुनेचा वाद सुरु आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशावरून सदर शेतीच्या मौका पंचनाम्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी आले होते. मात्र मंडळ अधिकाºयांचा हातातील अहवाल हिसकून फाडल्याचा गंभीर प्रकार अंजली विनायक पावडे हिच्याकडून घडला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान शेतात घडली.
पार्वताबाई पावडे हिच्या पतीची वडिलोपार्जित शेतजमीन बिबी येथे आहे. मुलबाळ नसल्याने शेतीचे काम करण्यास मय्यत विनायक फकरु भोयर याला आपल्या घरी आणले होते. विनायक फकरु भोयर हा १७ आक्टोबर २०१६ ला मरण पावला. मय्यत विनायक भोयर यांनी कोणताही नोंदणीकृत दस्तऐवज नसताना आपले नाव विनायक मुकुंदा पावडे या नावाने बदलवून घेतले. विनायक मुकुंदा पावडे या नावाचे कोणतेही कागदपत्र नसल्याने त्याचे मतदार कॉर्ड व आधार कॉर्डसुद्धा बनू शकले नाही. पार्वताबाई जमिनीची खरी मालक असताना निराधार वयोवृद्ध विधवेला मालमत्तेपासून दूर ठेवण्याचा बडजबरीने प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप पार्वताबाई पावडे हिने केला आहे.
विनायकच्या मृत्युनंतर वारसान प्रमाणपत्र व मौका चौकशीच्या आधारे पत्नी अंजली विनायक पावडे (भोयर) व माज्या पतीची वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे दोघींचे ७/१२ वर नाव चढले. एकूण १५ एकर जमिनीपैकी अंदाजे ७ एकर जमिनीवर पार्वताबाईने सोयाबीनची पेरणी केली आहे. व उर्वरित ८ एकर जमिनीवर अंजली पावडे हिने कापूस व तूर पिकाची लागवड केली आहे. सातबाºयाप्रमाणे अर्ध्या-अर्ध्या शेतजमिनीवर दोघींचीही लागवड असताना अंजली पावडे, तिचे वडील गुलाब शंकर अवताडे व हरिदास कोंडूजी गौरकार हे तिघेही पार्वताबाईला शेतात जाऊन धमक्या देणे, तिला मदत करणाºयांच्या विरोधात पोलिसांत खोट्या तक्रारी देण्याचे काम सुरु असल्याचे पार्वताबाईने सांगितले.
अंजली पावडे हिच्याकडून पार्वताबाईचा पुतण्या आनंदराव पावडे, भाचा लक्ष्मण बोढे व विनोद बोढे यांच्यावर न्यायालयात तात्पुरता मनाई हुकुमाचा दिवाणी दावा टाकण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तिचा दावा फेटाळला. तसेच तहसीलदार कोरपना यांनी अंजली विनायक पावडे हिचा आक्षेप फेटाळला असतानासुद्धा अंजली पावडे, गुलाब अवताडे व हरिदास गौरकर शेतात येऊन अरेरावी करीत असल्याचा आरोप पार्वताबाईने केला आहे.

पार्वताबाई पावडे हिला मुलबाळ नाही. पतीच्या निधनानंतर तिला कोणाचाही आधार नाही औरसपुत्र म्हणून आणलेल्या विनायक भोयर यांनीची तिचा सांभाळ न करता घराच्या बाहेर काढून दिले. त्याच्या निधनानंतर त्याची पत्नी अंजलीने म्हाताºया पार्वताबाईवर अत्याचार करणे सुरु ठेवले असून संपूर्ण शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. रक्ताचे नाते म्हणून मी तिला साथ देत आहे त्यामुळे माज्याविरोधात पोलिसात खोट्या तक्रारी देत आहेत.
- आनंदराव पावडे (पार्वताबाईचा पुतण्या)
 

Web Title: Trying to grab land of this widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.