क्षयरोगमुक्तीसाठी सर्वजण झटू या !
By admin | Published: March 27, 2017 12:40 AM2017-03-27T00:40:15+5:302017-03-27T00:40:15+5:30
जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्याने क्षयरोग जनजागृती रॅली शुक्रवारला काढण्यात आली. सदर रॅलीचे उद्घाटन ....
प्रतिज्ञा : क्षयरोग जनजागृती रॅली
चंद्रपूर : जागतिक क्षयरोग दिनाचे निमित्याने क्षयरोग जनजागृती रॅली शुक्रवारला काढण्यात आली. सदर रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांच्या हस्ते राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व मालाअर्पण करण्यात आले. यावेळी क्षयरोग संपवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
सदर रॅलीला डॉ. मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.वाय. पुल्लकवार, महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, आय.एम.ए.चे सचिव डॉ. पियुष मुत्यलवार, रोटरी क्लब प्रकल्प सचिव अंजुम कुरेशी, नेहरू युवा केंद्राचे नजीर कुरेशी यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.
सदर रॅली जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून रामनगर मार्ग, जटपुरा गेट, पाण्याची टाकी व जिल्हा क्षयरोग केंद्र येथे समाप्त झाली. सदर रॅलीला जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, पंकज शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, प्रभादेवी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर एम.डी.आर. व एक्स.डी.आर. रुग्णासाठी प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रुग्णांना रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक हसानी, सचिव स्मिता जिवतोडे यांच्या हस्ते रुग्णांना प्रोटीन पावडर वाटप करण्यात आले.
सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. पुल्लकवार, प्रकाश रामटेके, खिरेंद्र पाझारे, किशोर माणुसमारे व जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.(नगर प्रतिनिधी)