तूर उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:13+5:302020-12-30T04:38:13+5:30
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : देशात प्रदूषणामध्ये अव्वल असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये मागील काही दिवसापासून धुळ प्रदूषणामुळे नागरिक बेजार झाले ...
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : देशात प्रदूषणामध्ये अव्वल असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये मागील काही दिवसापासून धुळ प्रदूषणामुळे नागरिक बेजार झाले आहे. औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या धुळामुळे तुकूम परिसर तसेच वडगाव, पडोली, तुळशीनगर, वृंदावननगर, राष्ट्रवादीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ साचत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यासंबंधी आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेय याकडे संबंधितांनी लक्ष देवून प्रदूषणावर आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
---
वृंदावन नगरातील रस्त्यावर अल्पावधीतच भेगा
चंद्रपूर : येथील वृंदावनगर परिसरामध्ये काही महिन्यापूर्वीच सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र निकृष्ट बांधकामामुळे या रस्त्यावर बांधकामाच्या अगदी काही दिवसातच भेगा गेल्या. काही नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देताच संबंधितांनी सिमेंट पाणी मारून डागडुजी केली. मात्र आता पुन्हा सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे. एका वर्षातच या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.