पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:40+5:302021-05-15T04:26:40+5:30

चंद्रपूर : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. ...

Turmeric is a great alternative for crop diversification | पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय

पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय

Next

चंद्रपूर : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले. जिल्ह्यातील १४८ शेतकऱ्यांमार्फत २५० एकर क्षेत्रावर लागवड केली होती. मागील हंगामामध्ये ओल्या हळदीला बाजारामध्ये १ हजार २०० रुपये पर्यंत तर वाळलेल्या हळदीला ९ हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाच्या हळद वाणाची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भात, कापूस, तूर, सोयाबीन यांचा सामावेश होतो. पीक पद्धतीमध्ये बदल ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी विस्तार कार्य आणि मनुष्यबळ अत्यंत आवश्यक आहे. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक बदल करिता हळद हा एक चांगला पर्याय असणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळद लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले असून बियाणे, इतर निविष्ठा तसेच हळद निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे यासाठी अनुदान दिले जाते.

बाॅक्स

कमी कालावधीतील पीक

कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक अशी हळदीची ओळख आहे. आहार, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधनं आणि धार्मिक विधी यासाठी हळदीचा वापर होतो. जमिनीचा कस वाढविणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असणे तसेच रानडुकरांचा उपद्रव कमी असतो. चंद्रपूर सारख्या जंगलव्याप्त प्रदेशात हे विशेष महत्त्वाचे आहे. हळद पिकाचे फायदे सुद्धा खूप आहेत. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय आहे.

Web Title: Turmeric is a great alternative for crop diversification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.