प्रायोगिक तत्त्वावर वळणमार्ग सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:43 PM2018-03-06T23:43:02+5:302018-03-06T23:43:02+5:30

जटपुरा गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी सौंदर्यीकरण पुरेसे नाही तर किमान एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जटपुरा गेटपासून वळण मार्ग सुरू करावा, ....

Turn on the experimental turnaround | प्रायोगिक तत्त्वावर वळणमार्ग सुरू करावा

प्रायोगिक तत्त्वावर वळणमार्ग सुरू करावा

Next
ठळक मुद्देजटपुरा गेट येथील कोंडी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला पर्याय

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जटपुरा गेटवर वाहतुकीची सतत कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी सौंदर्यीकरण पुरेसे नाही तर किमान एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर जटपुरा गेटपासून वळण मार्ग सुरू करावा, अशी मागणी शिवसेना व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
जटपुरा गेटजवळ दररोज शेकडो वाहनांची कोंडी होते. याच मार्गावर जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. परिणामी रुग्णांवर रुग्णालयात पोहोचवणे कठीण जाते. मनपा प्रशासनाने यावर मार्ग काढण्याऐवजी २५० कोटी रुपये खर्च करून जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्याचा घाट घातला. हा प्रकार पूर्णत: जनहितविरोधी आहे. यावर पर्याय म्हणून एक महिन्यासाठी जटपुरा गेटपासून नवीन वळण मार्ग सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनानी केली आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय चंदावार, सीटीझन फोरमचे अध्यक्ष रमनीक चव्हाण, सदानंद खत्री, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रमेश टिपले, जेसीआयचे अध्यक्ष प्रशांत जाजू, आॅटो संघटनेचे विशाल साव, दीपक दापके, अजय जयस्वाल, दिलीप कपूर, दीपक पद्मगीरवार, विनोद अनंतवार, विनोद गोलजवार आदी उपस्थित होते.

Web Title: Turn on the experimental turnaround

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.