विद्युत खंडित करणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:39+5:302021-02-06T04:51:39+5:30
घोसरी : कोविड १९ संचारबंदी काळातील सर्व ग्राहकाचे विद्युत देयक माफ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र ...
घोसरी : कोविड १९ संचारबंदी काळातील सर्व ग्राहकाचे विद्युत देयक माफ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण केले नाही. आता तर वीज खंडित करण्याचा इशाराच वीज कंपनीने दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहक घाबरले आहेत. ग्राहकांची वीज खंडित करणे तात्काळ थांबवा, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात पोंभूर्णा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. पोंभूर्णा तालुक्यातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू नये. तसेच वीज कापण्यासाठी कोणताही कर्मचारी गावखेड्यात आल्यास गंभीर परिणाम होतील, अशा इशारा निवेदनातून संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
निवेदन देताना मनसे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपत्तीवार, उपाध्यक्ष किशोर वाकुडकर, मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम, शहर अध्यक्ष निखिल कन्नाके, तालुका सचिव अमोल ढोले, पवन बंकावार, कौशल चिचघरे, प्रशांत फुलझेले, संतोष पेंदोर, कुणाल बुरांडे, निखील शेट्टे, राजेश गेडाम, नुतन नैताम, वैभव घाटबांधे, महेश नैताम, प्रमोद ढाक, प्रज्योत मानकर, देवा मानकर, आशिष आर. नैताम आदी उपस्थित होते.