बारावीच्या निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:42+5:302021-07-03T04:18:42+5:30
कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर ...
कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची शाश्वती नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार, हा प्रश्न पालकांना सतावू लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षेबाबत सध्या तरी खरे दिसत नाही. त्यामुळे आता अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. त्यातही प्रॅक्टिकलही झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कसे द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. यावरून शिक्षकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. बारावीला अंतर्गत गुण नाहीत. अशा स्थितीत बारावीच्या निकालाबाबत शिक्षण विभागाचे नेमके धोरण काय राहील, हे सध्या तरी स्पष्टपणे सांगत नाही. याकडे प्राचार्यांनी लक्ष वेधले. अकरावीला शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी या वर्षाला ‘रेस्ट इयर’ समजतात. त्यामुळे भविष्यातील शिक्षणाचे नुकसान होणार, ही धास्ती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत...
कोरोनाच्या धास्तीमुळे शिक्षण विभागाने गतवर्षी अकरावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांना १२ वीत पदोन्नत करण्यात आले. मात्र, अभ्यासातील अडचणी जैसे थे होत्या. अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कन्सेप्टच दूर झाला नाही. त्यामुळे ज्ञान व माहितीचा पाया कच्चा राहिला. प्रॅक्टिकलही झाल्या नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थी पदोन्नत झाले, तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी चिंता पालकांमध्ये कायम आहे.
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?
बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० गुणांची गणित व इंग्रजी विषयांची तोंडी परीक्षा घेतली जाते. त्याशिवाय २०-२० गुणांची अन्य विषयांचीही चाचणी होते. ही परीक्षा देणाऱ्यांना अंतर्गत गुण मिळतात. कोरोनामुळे वार्षिक व अन्य विषयाच्या तोंडी परीक्षाही घेता आल्या नाहीत. यातून विद्यार्थ्यांची क्षमता चाचणीही करता आली नाही.
कोट
विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता
बारावीची परीक्षा व निकालाचा तिढा अद्याप सुटला नाही. कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीतही तफावत आहे. सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास प्राचार्यांकडून शिक्षण विभागाचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे यंदा शिक्षणाचे काय होणार, याची चिंता आहे.
- संजय नागापुरे, विद्यार्थी, चंद्रपूर
अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्याआधारे केले जाणार आहे. त्यातही यंदा प्रॅक्टिकल झाले नाही. त्यामुळे गुणदान कसे करणार, याची माहिती अद्याप शाळेकडून मिळाली नाही. याबाबत नोटीस बोर्डवर स्पष्ट माहितीपत्रक लावावे.
- तनुश्री भागडकर, विद्यार्थिनी चंद्रपूर