मोफत शाळा प्रवेशासाठी अडीच लाख विद्यार्थी रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:23 PM2019-03-29T22:23:40+5:302019-03-29T22:24:17+5:30
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१९-२०२० या सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
यावर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यातील नऊ हजार १९४ शाळांमधील एक लाख १६ हजार ८२१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात दोन लाख ३० हजार ६२३ अर्ज आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ६००७, अमरावती ७८३१, भंडारा २३५३, बुलढाणा ४८६६, चंद्रपूर ३४८५, गडचिरोली ११०६, गोंदिया २५१४, नागपूर २५१६०, वर्धा ३८८५, वाशिम १४४८, यवतमाळ ४७४५ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.
मोबाईल अॅपमार्फत ८४५ अर्ज
आरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. तसेच मोबाईल अॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. मात्र अॅपद्वारे केवळ ८४५ पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज केले आहे. त्यामध्ये हिंगोली एक, गोंदिया सहा, जलगाव १७, जालना ३६, कोल्हापूर ५४, लातूर १६, मुंबई १७, मुंबई १, नागपूर ४५, नांदेळ १७, अहमदनगर ३५, अकोला १२, अमरावती ६, औरंगाबाद ७९, भंडारा दोन, बीड ३५, बुलढाणा १९, चंद्रपूर तीन, धुळे ६, गडचिरोली दोन, नंदूरबार एक, नाशिक ४३, उस्मानाबाद १३, पालघर आठ, परभणी ८, पुणे २२४, राजगड १८, रत्नागीरा दोन, सांगली २६, सातारा आठ, सोलापूर १९, ठाणे ५२, वर्धा पाच, वाशिम चार, यवतमाळ पाच अॅपद्वारे अर्ज केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज
आरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील ९६३ शाळेतील १६६२३ जागेसाठी ५१ हजार ३२० पालकांनी अर्ज केले आहेत. नागपूर सात हजार २०४ जागेसाठी २५१६०, ठाणे १५१५२, औरंगाबाद १३५५० तर सर्वात कमी नंदूरबार ४८०, रत्नागिरी ८८९, सिंधुदुर्ग ५९३ पालकांनी अर्ज केले आहेत.