२३ केंद्रातून अडीच हजार शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:28+5:302021-04-07T04:29:28+5:30
चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. ...
चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. ही योजना यापुढे ही सुरुच राहणार असून नागरिकांना पाच रुपयांत भोजन मिळणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ केंद्रातून अडीच हजार थाळींचे वितरण केले जात आहे. त्यामुळे पुन्हा सुरु झालेल्या मिनी लाॅकडाऊनमध्ये गरजूंना लाभ मिळणार आहे.
मागील वर्षी कोरोेनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता पुन्हा राज्य सरकारने शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्येच वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोरोना संकटाने पुन्हा तोंड वर काढले आहे. अशावेळी गरीब नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांना जेवण करता यावे यासाठी पूर्वीप्रमाणे पाच रुपयांत थाळी देण्यात येणार आहे.
या थाळीमध्ये पोळी, भाजी, वरण, भात दिला जातो. मोलमजुरी करणारे मजूर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे. आता मिनी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी गरजूंना या थाळीचा लाभ होणार आहे.
बाॅक्स
चंद्रपूर शहरात ६ केंद्र
जिल्ह्यात शिवभोजनचे २३ केंद्र असून चंद्रपूर शहरामध्ये सहा केंद्राच्या माध्यमातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, बल्लारपूर, घुग्घुसमध्ये प्रत्येकी एक शिवभोजन केंद्र आहे.
बाॅक्स
अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे दणाणले धाबे
जिल्ह्यात २३ केंद्रातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील एका केंद्रातून शिवभोजन थाळी ऐवजी मसाला भात वितरित केला जात होता. या केंद्रावर अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे अन्य केंद्र संचालकांचे धाबे दणाणले.