दोन दुचाकी धडकल्या, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:16+5:302021-06-28T04:20:16+5:30

चिमूर : सावरगाववरून चिमूरकडे एक व्यक्ती दुचाकीने येत असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकी धडक बसली. यात दोघांचा जागीच मृत्यू ...

Two bikes collided, killing both | दोन दुचाकी धडकल्या, दोघांचा मृत्यू

दोन दुचाकी धडकल्या, दोघांचा मृत्यू

Next

चिमूर : सावरगाववरून चिमूरकडे एक व्यक्ती दुचाकीने येत असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकी धडक बसली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ रविवारी दुपारी घडली.

अजय राऊत (४७) वर्ष रा. इंदिरा नगर, चिमूर व सनी आरोवा (२४) रा. खामखरोली जि. शिवणी मध्य प्रदेश अशी मृतकांची नावे आहेत. अतुल चोधरी (२७) रा. नाचणभट्टी हा जखमी आहे. चिमूर येथील रहिवासी अजय राऊत हे छोटे मोठे बिल्डिंगचे काम करतात. रविवारी सकाळच्या दरम्यान मजुरांसाठी सावरगाव येथे एमएच ३४ एवाय ८७०८ या क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. काम आटोपून चिमूरला परत येत असताना चिमूर कान्पा मार्गावर कॅनलच्या पुलाच्या कामावर सनी आरोवा व अतुल चौधरी हे एमएच ३४ ६४०९ या दुचाकीने जात असताना दोन्ही दुचाकींची एकमेकांना धडक बसली. यात अजय राऊत व सनी आरोवा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल चौधरी जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्या मादर्शनात पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख करीत आहेत.

===Photopath===

270621\1641-img-20210627-wa0010.jpg

===Caption===

चिमूर कांपा मार्गावरील अपघात झालेले दुचाकी वाहन

Web Title: Two bikes collided, killing both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.