दोन घटनांमध्ये ६१ जनावरांना जीवदान

By admin | Published: May 6, 2017 12:35 AM2017-05-06T00:35:10+5:302017-05-06T00:35:10+5:30

नागपूर वरून अदिलाबाद कत्तलखान्याकडे तीन ट्रकमध्ये कोंबुन ६५ बैल नेत असताना साखरवाही रस्त्यावर पडोली पोलीसांनी दोन कारवाया केल्या.

In two cases, 61 people were killed | दोन घटनांमध्ये ६१ जनावरांना जीवदान

दोन घटनांमध्ये ६१ जनावरांना जीवदान

Next

सहा आरोपींना अटक : तीन ट्रक पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : नागपूर वरून अदिलाबाद कत्तलखान्याकडे तीन ट्रकमध्ये कोंबुन ६५ बैल नेत असताना साखरवाही रस्त्यावर पडोली पोलीसांनी दोन कारवाया केल्या.
बुधवारी रात्री नागपूरकडून कतलीसाठी दोन ट्रकमधून ४० बैल जनावरे नेण्यात येत असल्याची माहिती रात्रकालीन गस्तीदरम्यान पडोली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पडोली व धानोरा टोल नाक्यावर पाळत ठेवली. मात्र त्यांना समजले की, ट्रक परत साखरवाही रस्त्याने भद्रावतीकडे वळविण्यात अला. पोलिसांनी सिनेसाईट पाठलाग करून त्याला साखरवाही रस्त्यावर पकडले. या प्रकरणात शामसुंदर ठाकूर, फैयाज अहमद मुबारक अली अंसारी, शक्तीनगर, नागपूर, रमीज रज्जाक जमीर खान, यशोधरानगर, नागपूर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ट्रक्र.एमएच ४० वाय.ई. ९४७९, एनएल ०२-३२५२ सह चार मृत व चार गंभीर जखमींसह ४० बैल ताब्यात घेतले.
दुसऱ्या कारवाईमध्ये नागपूरकडून ट्रकमध्ये कोंबून अदिलाबाद ( आंध्र प्रदेश) च्या कत्तलखान्यात नेणाऱ्या ट्रकला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घुग्घुस - साखरवाही रस्त्यावर पकडून २५ बैलांसह ट्रक व तीन आरोपीला पडोली पोलीसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी शेख महमद शेख खाज्यां, सलीम खान गफूर खान, मुमताज अहमद अब्दुल सत्तार रा. टेकानाका, नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: In two cases, 61 people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.