दोन बालविवाहाचा घाट उधळला

By साईनाथ कुचनकार | Published: June 7, 2024 05:21 PM2024-06-07T17:21:32+5:302024-06-07T17:22:06+5:30

चाईल्ड हेल्पलाइन : जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही

Two child marriages were thwarted | दोन बालविवाहाचा घाट उधळला

Two child marriages were thwarted

साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर
चंद्रपूर : पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले आहे. विशेष म्हणजे, जिवती तालुक्यातील ५ बालविवाह यावर्षी प्रशासकीय यंत्रणेने थांबविले आहे.

चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाइन च्या १०९८ क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहायक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला. यानंतर चाइल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले. ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाइनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदीप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे, किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 

येथे करा तक्रार
बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास किंवा बालविवाह होत असल्यास १०९८ या चाईल्ड हेल्पलाइनवर संपर्क करा. या हेल्पलाइनवर माहिती द्या. यामुळे बालविवाह थांबविण्यास मदत होते.
 

बालविवाह केल्यास जावे लागणार जेलमध्ये
मुला-मुलींचे बालविवाह केल्यास त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई केली जाते. जेलचीही हवा खावी लागू शकते. त्यामुळे आपल्या मुला-मुलींचे बालविवाह करू नये, जिथे असे प्रयत्न केले जाते. त्याचीही माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Two child marriages were thwarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.