घुग्घुसमधील वीजग्राहकांकडे दोन कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:17+5:302021-02-09T04:31:17+5:30
घुग्घुस वितरण विभाग कार्यालयांतर्गत ग्रामीण भागात ७ हजार ६०० वीजग्राहकांची संख्या तर घुग्घुस शहरात वीजग्राहकांची ६ हजार ७०० इतकी ...
घुग्घुस वितरण विभाग कार्यालयांतर्गत ग्रामीण भागात ७ हजार ६०० वीजग्राहकांची संख्या तर घुग्घुस शहरात वीजग्राहकांची ६ हजार ७०० इतकी आहे. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडे सुमारे ६० लाख, तर घुग्घुस शहरातील वीजग्राहकांकडे १ कोटी ४० लाख रुपये, असे एकूण २ कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती आहे.
कोरोना काळातील वीजदेयके माफ करण्यात यावे, यासाठी भाजपने तीन-चारदा वीजबिलाची होळी करून देयके माफ करा, अशी मागणी केली. तर निवडणुकीदरम्यान दोनशे युनिट माफ करण्याचा मुद्दा पुढे आला. यामुळे मोठया संख्येने वीजग्राहकांनी देयके भरले नाही. आजपावेतो वीजदेयके माफ होईल, या आशेत असताना व्याज दराचा अधिक भुर्दंड वीजग्राहकांना बसणार तर नाही ना, अशी चिंता वीजग्राहकांना लागली आहे.