बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दोन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:21+5:302021-09-04T04:33:21+5:30

फोटो बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर तेराव्या शतकात तत्कालीन गोंड शासक आदिया बल्लारशा यांनी बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे ...

Two crore sanctioned for conservation of historical forts in Ballarpur | बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दोन कोटी मंजूर

बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दोन कोटी मंजूर

Next

फोटो

बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर तेराव्या शतकात तत्कालीन गोंड शासक आदिया बल्लारशा यांनी बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटन विकासाकरिता माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधीतून दोन कोटी रुपये मंजूर केले आहे.

तद्वतच किल्ल्याच्या संवर्धन आणि विकास कार्याकरिता पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या प्रमाणपत्राकरिता पुरातत्व विभागाकडून आलेल्या टीमने किल्ल्याचे सर्वेक्षण नुकतेच केले. सर्वेक्षणानंतर नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात भारतीय पुरातत्त्व पश्चिम विभागाचे रिजनल डायरेक्टर नंदिनी भट्टाचार्य शाहू, आरकॉलॉजिस्ट नागपूर मंडळाचे सुप्रिटेंडिंग रेड्डी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाचे अधीक्षक शिल्पा जांगडे, चंद्रपूर सब सर्कलचे प्रशांत शिंदे, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगर परिषदेचे नगर अभियंता संजय बोढे यांची उपस्थिती होती. सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर किल्ल्याचे सौंदर्यीकरण व संवर्धन कार्याला लगेचच प्रारंभ होणार आहे. गोंडकालीन हा किल्ला बल्लारपूरचे ऐतिहासिक वैभव आहे, हे विशेष.

030921\fb_img_1563781096181.jpg

बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दोन कोटी रुपये मंजूर पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र करिता किल्ल्याचे सर्वेक्षण

Web Title: Two crore sanctioned for conservation of historical forts in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.