दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

By admin | Published: February 24, 2016 12:52 AM2016-02-24T00:52:00+5:302016-02-24T00:52:00+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशनतर्फे ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नॅशन बिल्डर’ या विषयावर ...

The two-day International Conference concludes | दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Next

मान्यवरांचे मार्गदर्शन : ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नेशन बिल्डर’ विषयावर परिषद
चंद्रपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशनतर्फे ‘डॉ. आंबेडकर अ‍ॅज ए नॅशन बिल्डर’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचा समारोप शनिवारी केंद्रीय रासायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
याप्रसंगी प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सहसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिय सोसायटीचे कुणाल घोटेकर, जागरण शिक्षण संस्थाचे मतीन शेख, शरद पवार कला महाविद्यालयाचे प्राचार्य सिंग, शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर, परिषदेचे संघटक सचिव डॉ. प्रमोद शंभरकर, परिषदेचे समन्वयक डॉ. इसादास भडके आदी मंचावर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आम्ही लोकप्रतिनिधी झालोत या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याकरिता बाबासाहेबांनी संविधान दिले. ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर त्यांच्या १२५ व्या जयंतीननिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद चंद्रपुरात होत आहे. त्याचा मला अभिमान वाटतो, असे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. प्रमुख पाहुणे डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांनीही या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी परिषदेनिमित्त ५०० शोधनिबंध असलेल्या सीडीचे प्रकाशन मान्वर पाहुण्याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. तक्षशील सुटे यांनी केले. प्रास्ताविक संघटनेचे सचिव डॉ. प्रमोद शंभरकर यांनी केले. आभार समन्वयक डॉ. इसादास भडके यांनी केले. राष्ट्रगीताने आंतरराष्ट्रीय परिषदेची यशस्वी सांगता झाली. (प्रतिनिधी)

भारतीय राज्यघटना विकासाचा जाहीरनामा : विकास जांभुळकर
या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत डॉ. विकास जांभुळकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. डी. निमसरकार हे होते. डॉ. विकास जांभुळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून दिलेली राज्यघटना भारतीयांच्या विकासाचा जाहीरनामा आहे. भारतीय राज्यघटना माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करुन देणारी आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या भारताचे भवितव्य आकाराला आणणारी असल्याचे विकास जांभूळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

वंचितांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची : समीर कदम
भारतीय शिक्षणपद्धती पूर्वावार चालत आलेल्या अंधश्रद्धात्मक मुल्यांना खतपाणी देणारी आहे. विद्यापीठीय शिक्षणप्रणाली गरिबांना न परवडणारे असून भांडवलदारांना प्रोत्साहन देणारी आहे. भारताला महाशक्तीचे स्वप्न दाखविणारी असून महासत्तेला गालबोट लावणारी आहे, असे परखड मत पुसद येथील डॉ. समीर कदम यांनी मांडले. वर्तमान भारतीय विद्यापीठातील शिक्षण भारताला सूपर पॉवर बनविण्यास सक्षम आहे का? असा त्याचा व्याख्यानाचा विषय होता. ते पुढे म्हणाले, खाऊजा संस्कृतीमुळे शिक्षणाचा उफराटा झालेला असून सामान्य उच्च शिक्षणापासून दूर लोटल्या जात आहे. उच्च शिक्षणाचे सिलॅबस भारताला गुलाम करणारे जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणाबद्दलचा प्रगल्भ दृष्टिकोन मांडलेला आहे. दबलेल्या घटकांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार शिक्षणाच्या खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. शिक्षणातील आरक्षणासंदर्भात लंपडाव सुरु आहे असा आरोप त्यांनी केला.

Web Title: The two-day International Conference concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.