दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:08 AM2017-08-11T00:08:15+5:302017-08-11T00:10:39+5:30

पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले.

Two-day rain shower rises | दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

Next
ठळक मुद्देअनेक दिवस दडी : दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले. बहुप्रतीक्षेनंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. सायंकाळच्या सुमारास काळेकुट्ट आभाळ होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला आहे. मात्र जिल्ह्यावरील भीषण दुष्काळाचे संकट टळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस फारच कमी आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच आशेवर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.
जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो फोल ठरला आहे. हवामान खात्याचा अंदाज वारंवार फोल ठरत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. ९० टक्के शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. १० टक्के पेरण्या अद्यापही शिल्लक आहे. पाऊस वारंवार दगा देत आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने मागील सोमवारी जिल्ह्यात हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. दरम्यान, आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक ढग जमून आले आणि पाऊस बरसला. हा पाऊस बºयापैकी पडल्याने शेतकºयांना पीक वाचविण्यास मदत होणार आहे. मात्र पुढे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच.
प्रकल्पात अजूनही ठणठणाट
जुलै महिन्यातच पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात पाहिजे तसा जलसाठा संकल्पित होऊ शकला नाही. केवळ आसोलामेंढा प्रकल्पात ५७ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पात तर ४० टक्क्याहून कमी जलसाठा असल्याने पुढे पाण्याची मोठी टंंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पकडीगुड्डम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. लभानसराड प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणाची स्थितीही चिंताजनक आहे.

Web Title: Two-day rain shower rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.