इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले
By admin | Published: July 13, 2016 01:52 AM2016-07-13T01:52:55+5:302016-07-13T01:52:55+5:30
संंततधार पावसामुळे इरई धरणाची २०६.९२४ मिटर एवढी पाण्याची पातळी वाढली आहे.
दुर्गापूर : संंततधार पावसामुळे इरई धरणाची २०६.९२४ मिटर एवढी पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय चारगाव धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता इरई धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. इरई धरणाने उन्हाळ्यात २०४ मीटर एवढी निम्न पाण्याची पातळी गाठली होती. दरम्यान २६ जूनपासून येथे पावसाला सुरूवात झाली. ३० जूनला इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री तब्बल ८० मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. तेव्हापासून संततधार पाऊस सुरूच आहे. मंगळवारी धरणाने २०६.९२५ मिटर एवढी पाण्याची पातळी गाठली आहे. इरई धरण २०७.५०० मीटरवर ओव्हरफ्लो होते. धरणात सतत पाण्याची आवक सुरू असल्याने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता दोन दरवाजे ०.२५ मिटरने उघडण्यात आले आहेत. चारगाव धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. ते धरण ओव्हरफ्लो झाले की त्याचे पाणी इरई धरणात येते. त्यामुळे परत पाण्याच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे.