चारचाकी वाहनासह दोन लाख २४ हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:08+5:302021-05-31T04:21:08+5:30
चंद्रपूर : पडोली पोलिसांनी नागपूर ते चंद्रपूर रस्त्यावरील मोरवा गावाजवळ चारचाकी वाहनातून शनिवारी रात्री देशी-विदेशी दारूसह पाच लाख २४ ...
चंद्रपूर : पडोली पोलिसांनी नागपूर ते चंद्रपूर रस्त्यावरील मोरवा गावाजवळ चारचाकी वाहनातून शनिवारी रात्री देशी-विदेशी दारूसह पाच लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूर-चंद्रपूर मार्गावरून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पडोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुरलीधर कासार यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पडोली पोलिसांनी चंद्रपूर-नागपूर रोडवर पाळत ठेवली. यावेळी एम.एच. ०४, जीजे ७५३४ या क्रमांकाचे संशयित वाहन येताच पोलिसांनी त्या वाहनाला थांबविण्यासाठी हात दाखविला. मात्र, वाहनचालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळ काढला. अंधारामुळे त्याने वाहन गतिरोधकावर चढविले. वाहन बंद होताच तो वाहनचालक वाहन सोडून पळाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी करून त्यातून ९० एमएलच्या ८०० नग देशी दारू, रिझर्व्ह बी ७ च्या १९२ नग, मॅकडोल नं.१ कंपनीच्या १९२ नग बाटल्या, हेवर्ड कंपनीच्या १४४ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी पाच लाख २४ हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल जप्त करून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पडोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.