Chandrapur news Metal boll: चंद्रपूरमध्ये अवकाशातून पडलेले पुन्हा दोन सिलिंडर आढळले, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:22 AM2022-04-05T09:22:21+5:302022-04-05T09:31:01+5:30
Chandrapur news Metal boll: खळबळ उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव येथे आढळले आहेत. तालुक्यात असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : खळबळ उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव येथे आढळले आहेत. तालुक्यात असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून आठ फुटाची रिंग कोसळली होती. तालुक्यात अन्यत्र संयंत्राचे भाग विखुरलेले असल्याची दाट शक्यता होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंजेवाही परिसरातील पवनपार व मरेगाव येथे दोन अवशेष आढळून आले होते. हे गोलाकार सिलिंडर होते. दरम्यान, सोमवारी पुन्हा गुंजेवाही कोटा येथील बालाजी मंदिराच्या मागे तिसरा गोलाकार सिलिंडर मिळाला आणि लगेच काही अंतरावर असलेल्या आसोला मेंढा तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना चौथा सिलिंडर मिळाला.
निरीक्षणासाठी शास्त्रज्ञ अद्याप आलेच नाहीत
शनिवारपासून अवकाशातून पडलेले अवशेष सिंदेवाही पोलीस ठाण्यात आहेत. याचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत कुणीही आले नव्हते. विशेष म्हणजे, दररोज एक-एक अवशेष सापडत असल्याने तालुक्यात ते किती ठिकाणी पडले आहेत, याचा तपास आवश्यक
झाला आहे.