अगरबत्ती निर्मितीचे दोन संच सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:43 PM2018-08-08T22:43:26+5:302018-08-08T22:43:44+5:30

जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत अगरबत्ती निर्मितीमधील अग्रणी आयटीसी कंपनीसोबत बैठक घेऊन प्रकल्प निमार्णाचा मार्ग मोकळा केला.

Two set of agarbatti production will be started | अगरबत्ती निर्मितीचे दोन संच सुरू होणार

अगरबत्ती निर्मितीचे दोन संच सुरू होणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आयटीसीच्या अगरबत्ती प्रकल्पाचे दिवाळीमध्ये पोंभुर्ण्यात लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत अगरबत्ती निर्मितीमधील अग्रणी आयटीसी कंपनीसोबत बैठक घेऊन प्रकल्प निमार्णाचा मार्ग मोकळा केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना रोजगार देण्याचा मानस सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त जिल्हा म्हणून नावलौकिकास यावा यासाठी चंद्रपूरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात लघु उद्योगाला चालना दिली जात आहे. यातूनच अगरबत्ती उद्योग, डायमंड कटिंग सेंटर, टुथपिक निर्मिती केंद्र, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबूवर आधारीत विविध वस्तूंना विक्रीसाठी उभे राहत असलेले विविध केंद्र, आदिवासी महिलांची कुक्कुटपालन कंपनी, असे अनेक उपक्रम जिल्ह्यात सध्या सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या बांबूपासून अगरबत्ती निर्मिती समूह तयार करण्याबाबत अनेक आंतरराष्ट्रीय अगरबत्ती निर्माण कंपनीशी वाटाघाटी सुरू होत्या. यामध्येच मंगलदिप या विविध सुगंधी अगरबत्ती ब्रॅण्डच्या व्यवसायातील नामांकित आयटीसी कंपनीसोबत बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली. आध्यात्मिक संस्कृतीला मानणाºया भारतामध्ये विदेशातून अगरबत्तीची आयात होऊ नये, तसेच या श्रद्धेच्या विषयाला जंगलातील आदिवासी बांधवांच्या श्रमाचा सुगंध असावा , त्यातून त्यांना अर्थाजन व्हावे या भावनेतून चंद्रपूरमध्ये अगरबत्ती निमार्णाचे काही प्रयोग यापूर्वी करण्यात आले आहे.
आगरझरी व अन्य ठिकाणी छोट्या उद्योगसमूहाला चालना दिली आहे. त्यामुळे हा उद्योग करण्यासाठी पोभुर्णासारख्या आदिवासीबहुल भागाची निवड करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले होते. आता या आंतरराष्ट्रीय कंपनीशी करार करण्यात आला आहे. आता पोंभुर्णा येथे अगरबत्ती निर्माण मधील प्राथमिक युनिट आणि पॅकेजिंग युनिट असे दोन संच सुरू केले जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत पोंभुर्णातील हे काम पूर्णत्वास जाईल, अशी आशा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, महाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळाचे डीएसके रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, आयटीसी रिजनल मॅनेजर आशिष पॉल, आयटीसी अगरबत्ती चेन्नईचे उपाध्यक्ष सौंदर राजन, सचिन गुप्ता उपस्थित होते.

Web Title: Two set of agarbatti production will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.