गोंडपिपरी तालुक्यात दोन वाघ मृतावस्थेत आढळले, आठवडाभरापूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 16:19 IST2023-03-25T16:01:07+5:302023-03-25T16:19:38+5:30
दोन्ही वाघांचे सर्व अवयव शाबूत

गोंडपिपरी तालुक्यात दोन वाघ मृतावस्थेत आढळले, आठवडाभरापूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा परिसरातील डोंगरगाव बीटमध्ये वाघिणीसह बछड्याचा मृतदेह आढून आला आहे. दोन वाघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने आठवडाभरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ताडोबा वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीट परिसरात एक वाघिण व बछडा मृतावस्थेत आढळून आले. दोन्ही वाघांचे सर्व अवयव शाबूत आहेत. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. सध्या पशुवैद्यकांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, दोन वाघांचे मृतदेह सापडल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, दोन-दोन वाघांचा मृत्यू वन खात्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.