दुचाकीच्या शोरूमला मध्यरात्री भीषण आग; ९२ दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 08:59 PM2023-04-12T20:59:46+5:302023-04-12T21:00:25+5:30

Chandrapur News कोरपना येथील चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील हिरो कंपनीच्या आदर्श शोरूमला अचानक भीषण आग लागल्याने ९२ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

Two-wheeler showroom caught fire in the middle of the night; Burn 92 bikes | दुचाकीच्या शोरूमला मध्यरात्री भीषण आग; ९२ दुचाकी जळून खाक

दुचाकीच्या शोरूमला मध्यरात्री भीषण आग; ९२ दुचाकी जळून खाक

googlenewsNext

चंद्रपूर : कोरपना येथील चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील दुचाकीच्या शोरूमला अचानक भीषण आग लागल्याने ९२ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात शोरूमचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा शोरूम चालकाने केला आहे.

चंद्रपूर-आदिलाबाद या वर्दळीच्या महामार्गावर काही वर्षांपासून सय्यद आबिद अली यांच्या मालकीचे शोरूम सुरू आहे. अली हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. दिवसभर शोरूम सुरू ठेवल्यानंतर बुधवारी रात्री नियोजित वेळेला बंद करण्यात आले. या शोरूममध्ये ९२ दुचाकी, तसेच रोख रक्कम, दुचाकीचे सुटे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत ९२ दुचाकीचा जळून कोळसा झाला. याशिवाय, फर्निचर, संगणक, एसी, महत्त्वाची कागदपत्रे, पंखे व इतर अनेक वस्तू जळून खाक झाल्या. शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच सय्यद आबिद अली यांनी मध्यरात्री १.४५ वाजता कोरपना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रात्री २.१० वाजता अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने अर्ध्या तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात यश मिळविले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

आगीचे कारण अज्ञात

 शोरूमला आग प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आल्याचे समजते. मात्र, मध्यरात्री आग लागण्याचे कारण काय, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता चौकशीनंतर खरे कारण पुढे येईल, अशी माहिती देण्यात आली.

 

Web Title: Two-wheeler showroom caught fire in the middle of the night; Burn 92 bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग