अट्टल दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 19:18 IST2024-03-02T19:17:28+5:302024-03-02T19:18:50+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर, रामनगरहद्दीत पेट्रोलिंग करीत असता अतुल राणा याने दोन मोटारसायकल आपल्या घरी लपवून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली.

अट्टल दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
चंद्रपूर : शहरातील विविध ठिकाणांहून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ मार्च रोजी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीच्या दोन गाड्या जप्त केल्या आहे. अतुल विकास राणा (२५) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर, रामनगरहद्दीत पेट्रोलिंग करीत असता अतुल राणा याने दोन मोटारसायकल आपल्या घरी लपवून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अतुल राणा याच्या घरी गेला असता, एमएच ३४ बीडी ३८५४, एमएच ३४ एक्स ५३२७ या क्रमांकाच्या दोन दुचाकी आढळून आल्या. त्याला पकडून पोलिसांनी विचारणा केली असता, चंद्रपूर शहर हद्दीतील आझाद बगीचा जवळून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याकडून दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनी जितेंद्र बोबडे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे, ऋषभ बारसिंगे आदींनी केली.