दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:09+5:302021-06-20T04:20:09+5:30
चंद्रपूर : घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना रामनगर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त ...
चंद्रपूर : घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना रामनगर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. करण मुन्ना समुद (२४) रा. पंचशिल चौक, चंद्रपूर, आकाश सुरेश राठोड (२१) रा. हनुमान नगर, चंद्रपूर, सुमोहित चंद्रशेखर मेश्राम (२३) रा. अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर, सुधीप ठाकूरदास बिश्वास (२४) रा. किसननगर, ता. सावली, असे अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.
१ जून रोजी प्रियंका भारत रुपवते हिने नगिनाबाग, चोर खिडकी येथे आपल्या घरासमोर दुचाकी क्रमांक एमएच ३४ पी क्यू ६८८९ ठेवली होती. थोड्या वेळात घराबाहेर येताच दुचाकी तिथे नव्हती. तिने आजूबाजूला विचारणा केली. मात्र कोठेच दिसून आली आहे. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे केली. पोलिसांनी तपास करून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून होंडा कंपनीची मोपेड गाडी क्रमांक एमएच ३४ पी क्यू ६८८९, तसेच एमएच ३४ ए क्यू ८९४९ दुचाकी जप्त केली. ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात सपोनि मलिक, सपोनि एकरे, पोलीस हवालदार रजनीकांत पुट्टावार, प्रशांत शेंदरे, नापोशि पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, लालू यादव, भावना रामटेके आदींनी केली.