दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:19 AM2018-08-24T00:19:24+5:302018-08-24T00:20:09+5:30

तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही.

Two-year 'era' missing since two days | दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

दोन वर्षीय ‘युग’ दोन दिवसांपासून बेपत्ता

Next
ठळक मुद्देअपहरणाचा संशय : पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय युग अशोक मेश्राम हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. बुधवारी दुपारपासून तो अचानक गायब झाला. गुरुवारीही त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. या घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. सदर घटनेची तक्रार बुधवारी रात्रीच ब्रह्मपुरी पोलिसात केली आहे.
खंडाळा गाव ब्रह्मपुरीपासून तीन किमी अंतरावर आहे. गावातीलच एका चौकात युग बुधवारी दुपारी खेळत होता. सुमारे ४ वाजताच्या दरम्यान तो अचानक गायब झाला. सायंकाळी कुटुंबीयांना यूग कुठेच दिसून आला नाही. लगेच त्यांनी व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. अख्खा गाव पालथा घातला. रात्र होऊनही युगचा पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार करण्यात आली आहे.
ते वाहन कुणाचे ?
काही लहान मुलांच्या तोतड्या सांगण्यानुसार गावात नवीन नंबरची मोठी गाडी आली होती. गाडीत बसणारे दोन व्यक्ती आजूबाजूला पाहत होते. त्यांनीच युगचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. युगच्या बेपत्ता होण्याने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण चौकशी केली व युगच्या शोधकार्याला सुरुवात केली आहे..

Web Title: Two-year 'era' missing since two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.