भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 07:43 PM2022-07-02T19:43:46+5:302022-07-02T19:44:17+5:30

Chandrapur News आपल्या मुलासह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने जोरधार धडक दिली. यात दुचावरील गर्भवती महिला व तिच्या दोन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पती व एक मुलगा गंभीर जखमी झाले.

Two-year-old child and mother died in horrific accident | भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

googlenewsNext

चंद्रपूर : आपल्या मुलासह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने जोरधार धडक दिली. यात दुचावरील गर्भवती महिला व तिच्या दोन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर पती व एक मुलगा गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. नम्रता निखिल टावरी (२५), लक्ष टावरी (२) असे मृतकांचे नाव आहे, तर निखिल टावरी (३०) व कनक टावरी (५) अशी जखमींची नावे आहेत.

खुटाळा गावातील लहूजीनगरातील निखिल टावरी हे पत्नी नम्रता, मुले लक्ष व कनक या तिघांना घेऊन रुग्णालयात जात होते. रुग्णालयात जात असताना, राजस्थान फॅक्ट्ररीजवळ एमएच ४० बीएल ५८२७ या भरधाव ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबर होती की, गर्भवती नम्रता टावरी व दोन वर्षीय लक्ष टावरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती निखिल टावरी व कनक टावरी हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच, पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश कोंडावर यांची चमू घटनास्थळी दाखल झाली व घटनेचा पंचनामा केला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होऊ नये, यासाठी पत्रव्यवहार केला होता. संबंधित विभागाने वेळीच दखल घेत अवजड वाहतूक बंद केली असती, तर कदाचित ही अनुचित घटना टळली असती, अशी चर्चा लहूजीनगरात सुरू आहे. या घटनेमुळे लहूजीनगरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.

Web Title: Two-year-old child and mother died in horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.