रोहयो मजुरीसाठी दोन वर्षांपासून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:16 PM2018-11-05T22:16:32+5:302018-11-05T22:17:00+5:30

सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिवणी येथील नामदेव कोपलवार मागील दोन वर्षांपूवी रोजगार हमीच्या कामाला गेले होते. मात्र अजूनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने मजुरीसाठी तहसील कार्यालयात पायपीट करावी लागत आहे.

Two years have passed since the last two years | रोहयो मजुरीसाठी दोन वर्षांपासून पायपीट

रोहयो मजुरीसाठी दोन वर्षांपासून पायपीट

Next
ठळक मुद्देउपासमारीची वेळ : मजुरी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिवणी येथील नामदेव कोपलवार मागील दोन वर्षांपूवी रोजगार हमीच्या कामाला गेले होते. मात्र अजूनही त्यांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने मजुरीसाठी तहसील कार्यालयात पायपीट करावी लागत आहे.
नामदेव कोपलवार हे शिवणी येथील कक्ष क्रमांक २३२ येथे मिश्र रोपवनाच्या संरक्षणाचे काम २६ फेब्रुवारी २०१६ ते २३ मार्च २०१६ पर्यंत केले. रोजगार सेवकाने त्याचे हजेरीपट तयार करून वनविभाग कार्यालयात सादर केले. त्यानंतर अहवाल तहसील कार्यालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आला. मात्र सर्व अहवाल कार्यालयात गेल्यावर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांना मजूरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
कोपलवार यांनी मजूरीसाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांना बँक खाते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय शिवणी व तहसील कार्यालय येथे १६ आॅक्टोबर २०१७ ला जॉब कॉर्ड, आधार कॉर्ड, बँक पास बुकची छायांकित प्रत असे संपूर्ण कागदपत्र जमा केले.
मात्र त्यानंतरही त्यांना मोबदला मिळाला नाही. नुकतकीच दिवाळी या सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये मजुरीच्या पैशाचा हातभार लागेल, मुलाबाळांसाठी साहित्यांची खरेदी करता येईल, अशी अपेक्षा असतानाही प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे त्यांचा भम्रनिरास झाला आहे.
इतर कामगारांना मिळाला मोबदला
नामदेव कोपलवार यांच्यासह येथील कामावर वामन भिसे व इतर नागरिक गेले होते. या सर्वांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला. मात्र नामदेव कोपलवार यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून मजुरीच्या कामासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय, तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे आजपर्यंत त्यांचे दोन हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे मजुरीचे मिळणारे सर्व पैसे खर्च झाल्याने केलेल्या कामाला कोणताही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया कोपलवार यांनी दिली.

Web Title: Two years have passed since the last two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.