ओबीसींच्या हक्कासाठी प्रांतिक तैलिक महासभेचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:45+5:302021-07-07T04:34:45+5:30
चिमूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर विभागांतर्गत चिमूर येथे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेले ओबीसीचे आरक्षण अबाधित ...
चिमूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर विभागांतर्गत चिमूर येथे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेले ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवण्याकरिता आवश्यक माहिती ताबडतोब सुप्रिम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व राज्य सरकारद्वारा ओबीसीची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा, या मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले.
लाक्षणिक उपोषणाला जिल्हा परिषद गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांनी भेट देत प्रांतिक तैलिक महासभेच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक गजानन अगडे, नरेंद्र राजूरकर, चंद्रपूर जिल्हा सचिव ईश्वर डुकरे, चंद्रपूर विभागीय सचिव संजय खाटीक, सेवा आघाडीचे विभागीय सचिव रामदास कामडी, युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, पितांबर पिसे, विभागीय उपाध्यक्ष उमेश हिंगे, चंद्रपूर दक्षिण जिल्हाध्यक्ष कवडू लोहकरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार माथुरकर, महिला आघाडीच्या भावना बावनकर उपस्थित होते,