उमेद महिला आणि ग्रामपंचायतचे समन्वयाने लसीकरण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:24+5:302021-06-05T04:21:24+5:30

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पाच गावात उमेद महिला आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त सहभागाने लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली. ...

Umed Mahila and Gram Panchayat coordinated vaccination successful | उमेद महिला आणि ग्रामपंचायतचे समन्वयाने लसीकरण यशस्वी

उमेद महिला आणि ग्रामपंचायतचे समन्वयाने लसीकरण यशस्वी

Next

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पाच गावात उमेद महिला आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त सहभागाने लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये लसीकरणासंदर्भात अफवा पसरविल्या जात जात आहे. परिणामी नागरिक लसीकरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात गावागावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के व्हावे यासाठी पावले उचलण्यात आली. तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देऊन गावागावात चांगले काम करणाऱ्या उमेद अभियानाच्या महिला व तालुका स्तरावरील कर्मचारी आणि ग्रामपंचायतची मदत घेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील खेमजई, येनसा, मोखला, सोईट, एकर्जुना या पाच गावात ३ जून २०२१ रोजी लसीकरण करण्यात आले.

मोहीम यशस्वी करण्यासाठी उमेद तालुका चमूंनी गट विकास अधिकारी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पाचही गावात मोहीम राबवली. त्यासाठी ग्रामपंचायत आणि उमेद ग्रामसंघ कॅडर यांच्या सभा, गृहभेटी इत्यादी माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लसीकरण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांची नावासह यादी तयार करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने सर्व गावात लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य , गावातील नागरिक, ग्रामसेवक, आशा वर्कर, उमेद कॅडर, प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Umed Mahila and Gram Panchayat coordinated vaccination successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.