उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती देताहेत लर्निंग लायसन्सची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 05:00 AM2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:25+5:30

मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत माहिती असावी, यासाठी उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलीली परीक्षा देणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे आता आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्यास सुरुवात झाली आहे.

Unauthorized persons are giving the examination of learning license instead of the candidates | उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती देताहेत लर्निंग लायसन्सची परीक्षा

उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती देताहेत लर्निंग लायसन्सची परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी तक्रारी : उमेदवार व नेट कॅफेवर कायदेशीर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आधार कॉर्डच्या आधारे घरी बसूनच शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय १४ जूनपासून सुरू केली. मात्र काही ठिकाणी शिकाऊ उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निंग लायसन्सची परीक्षा देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोगस अधिकारी परीक्षा देत असल्याचे आढळून आल्यास त्यावर पोलीस कार्यवाही केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे. 
मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत माहिती असावी, यासाठी उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलीली परीक्षा देणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे आता आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक उमदेवारांच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती बसून परीक्षा देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जर उमेदवाराच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणत्याही नेट कॅफे, सेतू केंद्रानी असा प्रकार करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. 

लायसन्स कायमस्वरुपी अपात्र
nलर्निंग लायसन्स काढताना अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी आपत्र ठरणार आहे. तसेच ज्या महा इ-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करताना आढळून येतील, अशा संस्थाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या सावटात नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र उमेदवाराऐवजी अनाधिकृत व्यक्ती परीक्षा देत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्या आहेत. जिल्ह्यात असे आढळून आल्यास उमेदवारांवर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. आयपी एड्रेस ट्रेस करण्यात येणार आहे. एकाच आयपी एड्रेसवरुन परीक्षा होत असल्याचे आढळून आल्यास त्याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे.
- किरण मोरे,  
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

गोपनीय पथकांची नियुक्ती
लर्निंग लायसन्स काढताना उमेदवाराऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निग लायसन्सची परीक्षा देवू नये, म्हणून चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे गोपनिय पथक गठित करण्यात आले आहे. हे पथक महा इ-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे येथे डमी उमेदवार पाठवून पडताळणी करणार आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास त्या उमेदवारावर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

 

Web Title: Unauthorized persons are giving the examination of learning license instead of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.