ताडोबात विनापरवानगी सोडणारे रॅकेट उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:02+5:302020-12-04T04:55:02+5:30
सचिन कोयचाडे हा एजंटचे काम करायचा. तो ताडोबात बुकींग नसलेल्या पर्यटकांना हेरायचा. त्यांना पैशाच्या मोबदल्यात सफारीचे आमिष दाखवून त्यांना ...
सचिन कोयचाडे हा एजंटचे काम करायचा. तो ताडोबात बुकींग नसलेल्या पर्यटकांना हेरायचा. त्यांना पैशाच्या मोबदल्यात सफारीचे आमिष दाखवून त्यांना विशिष्ट जिप्सीत बसवायचे. ही बाब वनरक्षक टेकचंद सोनुले याला कळविली जायची. वनरक्षक सोनुले कर्तव्यावर असलेल्या रामदेगी गेटमधून बुकिंग वा परवाना नसताना कोणतीही नोंद न करता त्या जिप्सीला बिनदिक्कतपणे आत सोडायचा. अशा प्रकारच्या काही तक्रारी ताडोबा व्यवस्थापनाकडे प्राप्त झाल्या. या आधारे सापळा रचून मंगळवारी बनावट पर्यटकाच्या आधारे हे बिंग फोडले.
ताडोबामध्ये सफारीसाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागते. अनेकांना ठरलेल्या तारेखेला बुकिंग मिळत नाही. कित्येक दिवस वेटिंगवर राहावे लागते. काहीजण बुकिंग न करता थेट ताडोबात येतात. अशा पर्यटकांना रामदेगी गेटमधून अनधिकृतरित्या पैसे घेऊन विनापरवानगी थेट कोअरमध्ये प्रवेश दिला जात असल्याची घटना उजेडात आल्याने कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी पेंचच्या खुर्सापार गेटवर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती सूत्राने दिली.