अनधिकृत शाळा बंद कराव्या!

By Admin | Published: March 1, 2017 12:44 AM2017-03-01T00:44:21+5:302017-03-01T00:44:21+5:30

शासनाकडून शाळा सुरु करण्याची परवानगी न घेता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

Unauthorized schools should be closed! | अनधिकृत शाळा बंद कराव्या!

अनधिकृत शाळा बंद कराव्या!

googlenewsNext

इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : शासनाकडून शाळा सुरु करण्याची परवानगी न घेता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अशा शाळांवर शासनाचे व यंत्रनेचे कुठलेही नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे अनाधिकृत शाळा बंद करण्यात याव्या या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन इंडिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतिने शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अनधिकृत शाळा सुरु आहेत. याबाबत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांची कुठेही नोंद होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून गणल्या जातात. तसेच या शाळेत शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जाते. त्यामुळे अशा अनाधिकृत शाळा बंद करण्यात व्यावा या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. व निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, नागपूर विभागाचे उपसंचालक, शिक्षण सभापती आदींना पाठविण्यात आले. या शिष्टमंडळात इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कू लचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

या आहेत मागण्या
अनाधिकृत शाळा बंद करण्यात याव्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोई सुविधा न पुरविणाऱ्या शाळांवर कारवाई करुन १५ दिवसांत बंद करण्यात याव्या, शाळेमध्ये ज्या मंडळाची मान्यता आहे. त्याच मंडळाचे अभ्यासक्रम शिकविल्या जाते किंवा नाही, याबाबत चौकशी करावी, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक अशा सर्व अधिकृत शाळांची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलला उपलब्ध करुण देण्यात यावी, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अनाधिकृत शाळांची यादी पेपरवर पब्लिश करण्यात यावी, काही शाळांंना एका ठराविक ठिकांणची परवानगी आहे.त्याच परवानगीवर विविध ठिकांणी विविध नावाने शाळा सुरु केल्या आहेत. त्याची चौकशी करुन शाळांवर कारवाई करण्यात यावी, उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश दाखवून विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षणासाठी पाठवतात. अशा शाळांची चौकशी करण्यात यावी.

Web Title: Unauthorized schools should be closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.