अनियमित वेतनाचा शिक्षकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:48 AM2019-06-16T00:48:16+5:302019-06-16T00:48:35+5:30
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे नियमित वेतन गत काही महिन्यांपासून उशिरा खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे. परिणामी शिक्षण विभागातील वेतन पथकाच्या कामाविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण असून दर महिन्यांच्या एक तारखेला वेतन जमा करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे नियमित वेतन गत काही महिन्यांपासून उशिरा खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे. परिणामी शिक्षण विभागातील वेतन पथकाच्या कामाविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण असून दर महिन्यांच्या एक तारखेला वेतन जमा करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
अनेक शिक्षकांनी घरांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी अशा विविध कारणांसाठी कर्ज काढले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे बँकेच्या कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते, सोसायटीचे हप्ते उशिरा जमा होतात. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्न सराईचा खर्च, याबरोबरच पहिल्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या मुलांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना उसनेवारी पैसे घ्यावे लागत आहेत. बरेचदा वेतन पथकाकडे शिक्षकांनी विचारणा केली असता वेतन पथक कोषागार कार्यालयाकडे बोट दाखवते. याउलट कोषागार कार्यालय वेतन पथकाकडूनच बिले उशिरा येत असल्याचे सांगतात. पगारासोबतच इतरही अनेक समस्या भेडसावत असल्याने नियमीत वेतनाची मागणी आहे.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार देण्याचे शासनाचे आदेश आहे. अनेकदा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याच्या एक तारखेला पगार खात्यावर जमा करण्याचे शिक्षक पदाधिकाºयांना आश्वासन दिले आहे. तरी देखील शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींला सामोर जावे लागते.