केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत ३ कोटी २३ लाखांच्या कामांना मंजुरी
By admin | Published: July 14, 2014 11:51 PM2014-07-14T23:51:21+5:302014-07-14T23:51:21+5:30
अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी योजना सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी ३ कोटी २३ लाख रूपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
चंद्रपूर : अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी योजना सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी ३ कोटी २३ लाख रूपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील खेड्यांच्या विकासकामांना या निधीमुळे गती मिळणार आहे.
केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत थुटरा ते लखमापूर पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण १९ लाख, धोपटाळा शेरज (बु.) रस्त्याचे बांधकाम २० लाख, बीबी ते राजुरगुडा रस्त्याचे डांबरीकरण २४.५२ लाख, पालगाव ते हिरापूर रस्त्याचे डांबरीकरण १९.४३ लाख, देवाडा आश्रमशाळेच्या पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण १४.६५ लाख, लाईनगुडा ते डोंगरगाव रस्त्याचे बांधकाम १५ लाख, बामणवाडा येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम १९.५९ लाख, आवाळपूर ते सांगोडा रस्त्याचे डांबरीकरण २४.५२ लाख, बांबेझरी ते कसुंबी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ३८.०४ लाख, जिवती पांढरवाणी रस्त्यावर जिवती गावातून जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण २४.२१ लाख, महाराज गुडा ते सेवादासनगर रस्त्याची सुधारणा १९.४३ लाख, काकबन पोचमार्गाची सुधारणा १४.२१ लाख, आंध्रप्रदेश सिमेला जोडणाऱ्या हिरापूर ते गठ्ठेदारगुडा रस्त्याचे बांधकाम १४.५५ लाख, राळापेठ ते सालेझारी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ३०.९९ लाख, अशा एकूण १५ कामांसाठी २ कोटी ९८ लाख रूपयांची तरतुद यातून करण्यात आली आहे.
या सोबतच, जिवती तालुक्यात दोन ठिकाणी वाढीव नळपाणीपुरवठा योजनेसाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे.
गावात विकासकामे खेचून आणल्याबद्दल नानाजी आदे, अब्दूल जमिर, माणिकराव कुळसंगे, पांडूरंग शेंडे, अब्दुल जावेद, विठ्ठल थिपे, मुर्लीधर बल्की, शामसुंदर राऊत, अभय मुनोत, नागेश रत्ने, सिद्धार्थ वानखेडे, सर्वानंद वाघमारे, सुनिल लभाने, दामोधर नगराळे, वामन मुसळे, गोदरू पा. जुमनाके, निशिकांत सोनकांबळे, प्रल्हाद मदने, शेख ताजुद्दीन, विजय राठोड, महादेव नागोसे, कान्हु मडावी, अनंता बावळे, तिरूपती पोले, नानाजी मडावी, मारू कोडापे, झाडू कोडापे, मारोती आत्राम, इस्माईल शेख, जंगु सिडाम, सेतु सिडाम, राजु राऊत, वामन पवार यांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)