बिकट परिस्थितीत नैनाने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:23+5:302021-08-18T04:33:23+5:30
घरात अठरावे विश्व दारिद्र्य. आई, वडील मोलमजुरी करीत असतात. विहीरगाव जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ वीत शिक्षण घेणाऱ्या नैना ...
घरात अठरावे विश्व दारिद्र्य. आई, वडील मोलमजुरी करीत असतात. विहीरगाव जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ वीत शिक्षण घेणाऱ्या नैना यशवंत गेडाम हिने २०२०च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अत्यंत कठीण परिस्थितीत यश संपादन करून विहीरगाव गावाचे नाव तालुक्यात रोशन केले. या मुलीचा सत्कार पंचायत समिती सभागृहात सभापती लता पिसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन झाला. याप्रसंगी उपसभापती रोशन ढोक, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, गटशिक्षण अधिकारी डी. जी. मेश्राम, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिंगाबर मेश्राम यांच्या उपस्थितीत नैना यशवंत गेडामची निवड झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
170821\img-20210815-wa0407.jpg
नैना गेडाम हीचा सत्कार करतांना पंचायत समिती सभापती लता पिसे व उपस्थित मान्यवर