बेरोजगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:46 PM2019-02-20T22:46:37+5:302019-02-20T22:47:26+5:30
नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार डिसेंबर २०१८ मध्ये ३० हजार पोलिसांची भरती घेण्यात येणार होती. ती तात्काळ घ्यावी. म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जाहिरात देण्यात यावी, जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला असल्याने सर्व भरती प्रक्रियेतील फॉर्म विनामुल्य भरण्याची परवानगी द्यावी, पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी, एका जागेसाठी १:१५ चार रेशो ठेवण्यात यावा, वेगवेगळ्या जिल्ह्यांची भरती वेगवेगळ्या दिवशी घेण्यात यावी, जेणेकरुन एका उमेदवारास जास्त जागी संधी उपलब्ध होईल. आधी ग्राऊंड व नंतर पेपर घेण्यात यावा, शिक्षक भरती तत्काळ जाहीर करण्यात यावी व पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०१९ आधी रुजूपत्र देण्यात यावे, ७० कंत्राटी भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा व १०० टक्के भरती ही शासकीय माध्यमातून करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना देण्यात आले.