चंद्रपुरात बेरोजगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:49 AM2018-03-16T00:49:22+5:302018-03-16T00:49:40+5:30
चंद्रपूर जिÞल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने विद्यार्थी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिÞल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने विद्यार्थी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला.
शहरातील प्रमुख मार्गाने फिरत हा मोर्चा जिÞल्हाधिकारी कायार्लायावर धडकला. सदर मोर्चाचे नेतृत्व राष्टÑवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती द्यावी, बेरोजगारी दूर करावी, एमपीएससीच्या कमी करण्यात आलेल्या जागा वाढव्यावा, पोलीस भरतीतील कमी असलेला कोटा वाढवावा अशा अनेक मागण्या रेटून धरण्यात आल्या. मोर्चात विद्यार्थी व युवक मोठया संख्येत सहभागी झाले होते. गांधी चौक येथून निघालेल्या मोर्चात विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, संदीप गड्डमवार, मोरेश्वर टेंभुर्ड़े, राजेंद्र वैद्य, मुनाज शेख, वामनराव झाडे, सुनील दहेगावकर, बेबीताई उईके, दीपक जयस्वाल, शशी देशकर, राजू कक्कड़, सुनील काळे, प्रियदर्शन इंगले सहभागी झाले होते. जिल्हााधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणावर सडकून टीका केली. उद्योजक, कामगार वर्ग, शेतकरी, महिलावर्ग, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार यापैकी कोणीही शासनाच्या धोरणाबाबत समाधानी नसल्याचे ते म्हणाले. यापुढेही असाच अन्याय सुरु राहिल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन अधिक आक्रमक आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संजय ठाकूर, प्रदीप रत्नपारखी, पंकज ढ़ेंगारे, मंगेश पोटवार, फैय्याज शेख, सुजित उपरे, पवन बंडीवार, राहुल भगत, अजीम शेख आदी उपस्थित होते.