कर्जासाठी बेरोजगाराच्या हेलपाट्या

By admin | Published: September 19, 2015 01:18 AM2015-09-19T01:18:58+5:302015-09-19T01:18:58+5:30

पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून ...

Unemployment hazards for loans | कर्जासाठी बेरोजगाराच्या हेलपाट्या

कर्जासाठी बेरोजगाराच्या हेलपाट्या

Next

चंद्रपूर : पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून देखील बँकेकडून हेतुपुरस्पर कर्ज प्रकरण प्रलंबित ठवले आहे. त्यामुळे हताश होऊन शासन व प्रशासनाला मागील एक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असे पत्र ऊर्जानगर कोंढी येथील संतोष पारखी यांनी प्रशासनाला दिले आहे.
अटींची पुर्तता करूनही कर्ज मंजूर करण्यास दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र दिनी टॉवरवर चढून विरुगिरी करून प्रशासनाला जागे करण्याचे प्रयत्न संतोष पारखी याने केला होता. मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी लोकशाही दिनामध्ये पारखी यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Unemployment hazards for loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.