केंद्रीय मंत्र्यांनी घेतली लोकोपयोगी योजनांची झाडाझडती; निधीची केली चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 03:30 PM2022-09-24T15:30:51+5:302022-09-24T15:34:03+5:30

अंमलबजावणीतील अडचणी कळविण्याच्या सूचना

Union Minister Hardeep Singh Puri reviewed public utility schemes; Investigated funds | केंद्रीय मंत्र्यांनी घेतली लोकोपयोगी योजनांची झाडाझडती; निधीची केली चौकशी

केंद्रीय मंत्र्यांनी घेतली लोकोपयोगी योजनांची झाडाझडती; निधीची केली चौकशी

Next

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालविले जातात. अंमलबजावणीत अडचणी येत असतील तर तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून सोडविल्या जातील व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी योजनांची झाडाझडती घेतली. नियोजन सभागृहात केंद्रीय योजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम उपस्थित होते.

केेंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने दिलेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च केला, काही निधी शिल्लक आहे का, आदींबाबत केंद्रीय मंत्री पुरी यांनी विचारणा केली. कोणत्याही योजनेच्या तीन चार ठळक मुद्यांवरच चर्चा व्हावी. सर्व योजना सांगत बसणे योग्य नाही. योजनांची माहिती संबंधित मंत्रालयाकडे असतेच. योजनेचे जे उद्दिष्ट कार्यान्वयीन यंत्रणा पूर्ण करू शकली नाही, त्याबाबत माहिती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरी स्वराज्य संस्थेला थेट निधी उपलब्ध करून दिला. त्याचे नियोजन करावे, असा सूचनाही ना. पुरी यांनी केल्या. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पुढील भेटीत पुन्हा आढावा घेणार

केंद्रीय योजनांची माहिती जाणून घेण्यासोबतच पुढील भेटीत यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारीने आणि ठळक मुद्यांवर चर्चा करावी, अशा सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. यावेळी मनपा व जिल्हा परिषदने केंद्र पुरस्कृत योजनांचे सादरीकरण केले.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत कृषी विभागातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले. यात चकबोर्डा येथील गौतम सागोरे, बोर्डा येथील सुधाकर खोब्रागडे, पिपरी येथील देविदास देवतळे, देविदास येरगुडे आणि बेलसनी येथील आकाश पोले यांचा समावेश होता.

Web Title: Union Minister Hardeep Singh Puri reviewed public utility schemes; Investigated funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.