अनोखे प्रेम! 'बिग डॅडी ऑफ टायगर'ला वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 22:29 IST2022-05-24T22:29:01+5:302022-05-24T22:29:26+5:30
Chandrapur News चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वाघडोह या वाघाचे अलिकडेच निधन झाले. त्याच्या निधनामुळे दुःखी झालेल्या नागरिकांनी त्याला चक्क श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला.

अनोखे प्रेम! 'बिग डॅडी ऑफ टायगर'ला वाहिली श्रद्धांजली
चंद्रपूर : जगप्रसिध्द ताडोबातील वाघडोह म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला. वाघडोह वाघ हा बिग डॅडी ऑफ टायगर म्हणून ओळखल्या जात होता. वाघडोह हा वृध्द वाघ वन विभागाच्या नजरेत होता. वाघडोहने वन्यप्रेमींना भुरळ घातली होती. वाघडोह जाण्याने वन्यप्रेमींमध्ये शोकाचे वातावरण आहे. न्यू सारस रिसोर्टच्या वतीने वाघडोहला अभिवादन करण्यात आले.
यावेळी ताडोबा कोर येथील एसीएफ महेश खोरे , वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे , मुन, गोंडे, चौहान,कोसनकर , सामाजिक कार्यकर्त्या भुवनेश्वरी गोपमवार तसेच युवसेना विधानसभा समन्वयक, संचालक न्यू सारस रिसॉर्ट अमोल मेश्राम, संचालक सारस संकेत वैद्य, हरीश रामटेके, हर्षद, उपस्थित होते.